संस्मरण/Memoir

20 नोव्हेंबर रोजी डॉ. नीळकंठ ढेरे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही, त्यांचे कुटुंबीय आणि विद्यार्थी या स्मृतिग्रंथाद्वारे त्यांच्या आठवणी जगासमोर आणत आहोत. आम्ही त्यांची पृथ्वीवरील उपस्थिती खूप गमावतो परंतु आम्हाला आशा आहे की हे पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान असेल. ते खरोखर एक "युगपुरुष" आहेत, एक अशी व्यक्ती जी एका युगात येते!
तुम्हाला तुमच्या आठवणींचे योगदान देण्यात स्वारस्य असल्यास, कृपया आमच्याशी rgdhere@gmail.com वर संपर्क साधा.

On the occassion of Dr. Neelkanth Dhere's birthday, 20th November, we, his family and students, are humbled to bring his memories to the world through this memoir. We miss his earthly presence dearly but we hope this will be a source of inspiration for generations to come. He is truly a "YugPurush", a person that comes once in an eon!
If you are interested in contributing your memories, please reach out to us at rgdhere@gmail.com.

Download here

ॐ श्रीपरमात्मने नमः

श्रीमद्भगवद्गीता शास्त्रोक्त उच्चारात अन्वय व अर्थासहित वेबसाईटवर उपलब्ध

निवेदन

श्रीमद भगवद्गीता गीताग्रंथाची महानता निर्विवाद आहे. सदर वेबसाईटसाठी आधारभूत श्रीमद भगवद्गीता ग्रंथाचे निवेदक माननीय जयदयाल गोयन्दका तसेच आमचे स्वामी माधवानंद यांचे विचार नमूद करू इच्छितो. जगामध्ये श्रीमद भगवद्गीतासारखा कल्याणासाठी उपयोगी ग्रंथ नाही. गीतेमध्ये ध्यानयोग, भक्तियोग इत्यादि पैकी कोणतेही साधन आपापल्या श्रद्धेप्रमाणे, आवडीप्रमाणे आणि योग्यतेप्रमाणे केल्यामुळे मनुष्याचे त्वरित कल्याण होऊ शकते. त्यासाठी ते म्हणतात की गीतेचे अर्थ व भाव यांसह मनन केले पाहिजे आणि त्याप्रमाणे आपले जीवन घडविण्या साठी आजीवन प्रयत्न केले पाहिजेत. तसेच आमचे स्वामी माधवानंद जी म्हणतात भगवानविष्णूंनी आत्मस्थिति प्राप्त करून घेण्याचा मार्ग सांगणारे गीतारूपी वरदान सर्व विश्वाला दिले. भगवान श्रीकृष्णांना गीतेद्वारे अर्जुनाला आणि त्याच्या निमित्ताने सर्व जगाला भक्ति-कर्म- ज्ञान- योग यांचा उपदेश दिला.

Read more